शिरूर तालुका

शिक्रापूरच्या बँकेतून ग्राहकाचे सहा लाख गायब

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका बँकेमध्ये एका टाकलेले तब्बल 5 लाख 97 हजार रुपये अचानक गायब झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे याबाबत अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडस्लंड बँकेच्या बँक खात्यावर सनसवाडी येथील किराणा दुकानदार नारायणलाल देवासी यांच्या जमीन विक्रीतून आलेले 5 लाख 97 हजार 138 रुपये ठेवलेले होते. देवासी यांना त्यांच्या दुकानाच्या मालासाठी व्यापाऱ्याला पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी मोबाईल वरुन पैसे पाठवण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांच्या बँक खात्यावर फक्त 138 रुपये असल्याचे तसेच 5 लाख 97 हजार रुपये गायब झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन खात्याबाबत चौकशी केली असता बँकेतून वेगवेगळ्या ठिकाणच्या बँक खात्यांवर तब्बल 5 लाख 97 हजार रुपये ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले.

त्यामुळे आपली बँकेतून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्याने नारायणलाल पकाराम देवासी (वय ४२) रा. भुजबळ वस्ती सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

11 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

12 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

12 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

12 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

17 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

17 तास ago