शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): सामाजिक जबाबदारी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज असलेल्या पोलीस दलाचा संवेदनशील चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. शनिवारी 1 वाजल्याच्या दरम्यान शिक्रापूर येथील चाकण चौकात हरवलेली तब्बसून झहीर खान ही केवळ ५ वर्षीय चिमुरडी सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात परत आली असुन.
देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 1 वाजलेच्या दरम्यान चाकण चौक परिसरात रडत असलेल्या एका लहान मुलीकडे कानिफनाथ रासकर यांचे लक्ष गेले. त्यांनी त्वरित ही बाब तेथे गस्त घालत असलेल्या पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांच्या निदर्शनास आणून दिली. देवरे यांनी तत्काळ त्या बालिकेला ताब्यात घेतले.
प्रथम विचारपूस केली असता मुलगी हिंदी भाषेत बोलत असल्याने तिचा विश्वास संपादन करण्यासाठी तिला शांत केले व कॅडबरी दिली. तत्पश्चात तिचा फोटो सोशल मीडियावर प्रसारित करून पालकांचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. अल्पावधीतच माहिती मिळाली की तिचे वडील झहीर अतिहुसेन खान हे भंगार दुकानात मजुरी करतात. दुकानमालकाच्या मदतीने देवरे यांनी वडिलांशी संपर्क साधला आणि मुलगी सुखरूप असल्याची खात्री दिली. नंतर ती चिमुरडी वडिलांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोपवण्यात आली.
घरातील आई कामात व्यस्त आणि वडील कामावर असताना खेळता-खेळता ही मुलगी महामार्गाकडे भटकत आली होती. परंतु वेळेवर पोलिसांचे लक्ष गेले नसते, तर गंभीर अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.
बालिका परत मिळाल्याच्या क्षणी वडिलांच्या डोळ्यांत आनंद अश्रू दाटले. “माझ्या मुलीचे प्राण वाचवलेत,” अशा शब्दांत त्यांनी हवालदार मिलिंद देवरे व कानिफनाथ रासकर यांचे मनापासून आभार मानले आहेत.
देवरे यांनी सांगितले की चुकीच्या व्यक्तीकडे मुलगी गेली असती तर?
शारीरिक इजा किंवा लैंगिक अत्याचाराचा धोका
खुनासारखा गंभीर अनर्थ
कुटुंबावर कायमचा भावनिक आघात
जनतेसाठी धडा
ही घटना पालक व समाजासाठी मोठा धडा ठरली आहे.
लहान मुलांना कधीही एकटे सोडू नये
त्यांनी “ओळखीबाहेरील व्यक्तीकडून मदत घेऊ नये” हे बालपणापासून शिकवणे गरजेचे आहे.
शाळा, शेजारीपणा, खेळाची मैदाने – सर्वत्र पालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे
शिक्रापूर पोलिसांची वेळेवर केलेली तत्पर कारवाई ही केवळ एका कुटुंबाचे नव्हे तर समाजाचेही जीव वाचवणारी ठरली आहे
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…