शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथे उसने घेतलेले पैसे मागितले म्हणूण आरोपींनी उसाच्या शेतात खून करून मृतदेह लपविल्याची घटना उघडकीस आल्यानंतर अवघ्या चार दिवसांत शिरूर पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय ५०) यांच्या खुनाचा तपास काही तासांत वेगाने उलगडत आरोपींपर्यंत पोहोचत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे.
सुनील उर्फ शैलेश सुखदेव मुळे व रमेश बारकू पवार (दोघे रा. फाकटे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड, मयताचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहेत. मंगळवार (दि.१९) सकाळी घराबाहेर पडलेले टेके रात्रीपर्यंत परतले नाहीत. नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला असता त्यांची दुचाकी कवठे येमाई–गांजेवाडी रोडलगत उभी सापडली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या किलोमीटरवर उसाच्या शेतात त्यांचा मृतदेह आढळला. डोक्यावर व मानेवर गंभीर जखमा असल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, तपासात उघड झाले की, टेके यांनी आरोपींना सुमारे दीड लाख रुपये उसने दिले होते. पैसे परत मागितल्याने आरोपी संतापले आणि कट रचून लोखंडी रॉडने टेके यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर अंगावरील दागिने लुटून मृतदेह उसात लपविण्यात आला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार पो.कॉ. सोनाजी तावरे, सागर बोऱ्हाडे व सहकार्याने यांनी .पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील सरदवाडी येथील राजगड हॉटेल परिसरात छापा टाकला. यात दोन्ही आरोपी जेरबंद झाले. या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक कारंडे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सहभागी होती. गावकऱ्यांनी पोलिसांनी जलद कारवाई करत सिसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल च्या सहाय्याने गुन्हयाची उकल करून चार दिवसातच आरोपी गजाआड केल्याने कौतुक केले असून, प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…