शिरूर तालुका

आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेखा गायकवाड यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील सामाजिक कार्यकर्त्यां सुरेखा सुरेश गायकवाड यांची आझाद समाज पार्टीच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. सुरेखा गायकवाड यांनी यापुर्वी आझाद समाज पार्टीच्या शिरुर तालुकाध्यक्षा म्हणुन काम केले आहे.

सुरेखा गायकवाड या नेहमीच शिरुर तालुक्यात महिलांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत असतात. तसेच आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून त्यांनी कारेगाव, शिक्रापुर, रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

या निवडीनंतर बोलताना गायकवाड म्हणाल्या, आझाद समाज पार्टीचे पुणे शहर व जिल्हाध्यक्ष तेजिंदर सिंग आलुवालिया यांच्या मार्गदर्शनाखाली या पुढे समाजातील तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत आझाद समाज पार्टीची ध्येय धोरणे पोहचविण्यासाठी काम करणार आहे. तसेच जिल्ह्यातील महिलांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कायमच पुढाकार घेणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

19 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

19 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

19 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago