शिरूर तालुका

सेंट जोसेफ स्कूलचा CBSE दहावी निकाल 100%; शाळेचा गुणवत्ता आणि यशाचा नवा उच्चांक

दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

शिरूर (अरुणकुमार मोटे): नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई इयत्ता दहावीच्या बोर्डाच्या निकालात शिरूरच्या सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलने पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्ता आणि परिश्रमाचा ठसा उमटवत सलग सहाव्या वर्षी 100% निकालाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी एकूण 108 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती आणि त्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे संख्यात्मक निकालाबरोबरच गुणवत्तेच्या निकषावरही शाळेचा निकाल अत्यंत उल्लेखनीय ठरला आहे.

शाळेचे दोन विद्यार्थी कु. प्रांजल खामकर आणि अनुभव जांग्रा यांनी थक्क करणारे 99% गुण मिळवत शाळेतीलच नव्हे तर तालुकास्तरावरही प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा, पालक, शिक्षकवृंद आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे, समाधानाचे वातावरण पररले आहे.

इतर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये पुढील नावे विशेष उल्लेखनीय आहेत

युगंधर शिंदे; 98.40% (द्वितीय क्रमांक)

आदित्य लांडे; 97.40% (तृतीय क्रमांक), कृष्णा पडवळ; 97%, संस्कृती रंधे – 96%, ओम नेमाडे; 96.80%, श्रेया तायडे – 96.80%,  अनुष्का शेवाळे 96%, ओवी पाटील, अनुष्का शेळके – 96%, वैष्णवी अडसूळ – 95%, दिव्या दुगड – 95%, सोनल सातकर – 94.40%, आर्यन थोरात,  ईश्वरी थोरात, लिकीशा सारडा – 94%,  श्रद्धा अडसुरे – 93.40%, कौस्तुभ राक्षे,  वर्षा हिंगणीकर, हर्षवर्धन शेळके – 93%, अजिंक्य दाते – 92.40%, आर्यन इंगळे, तनूजा भोसले – 92.20%,  अथर्व ताडगे,  आयुष उबाळे, श्रेया पाटील, ओम साळुंखे – 92%, झेबा अन्सारी – 91%,  शाहीन करंजूले – 90.40% या वर्षी एकूण 30 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा जास्त गुण मिळवले असून 24 विद्यार्थ्यांनी 80% पेक्षा जास्त गुण मिळवत शाळेच्या गुणवत्ता परंपरेला अनुसरून उज्ज्वल यश मिळवले आहे.

या यशामागे शाळेच्या प्राचार्या नॅन्सी अनिल पायस, अध्यक्ष दादाभाऊ वाखारे, शाळेचे मार्गदर्शक सुनील भाकरे, सर्व शिक्षकवृंद आणि इतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम व समर्पण आहे. विद्यार्थ्यांचे अभ्यासातील सातत्य, पालकांचा विश्वास, आणि शाळेतील शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण यामुळे हे नेत्रदीपक यश शक्य झाले.

शिरूर तालुक्यात सेंट जोसेफ शाळेच्या गुणवत्तेची, शिस्तीची आणि निकालातील सातत्यपूर्ण यशाची स्तुती केली जात आहे. शाळेच्या या घवघवत्या यशामुळे भविष्यातील विद्यार्थ्यांसाठीही एक प्रेरणादायी वाट ठरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago