शिरूर तालुका

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा

शिरुर (किरण शेलार-पिंगळे) गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘गुरुरत्न पुरस्कार’ वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी समाजात सकारात्मक दिशा देणारे, मार्गदर्शक ठरणारे व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला.

आई-वडील, शिक्षक आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्ती हीच खरी गुरुस्थाने असून, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते, असे संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सांगितले. यावेळी रविंद्र धनक सर, ह.भ.प. विलास महाराज पवार, संजय शितोळे सर (संचालक, शितोळे करिअर अकॅडमी), भजनसम्राट भाऊसाहेब धावडे आणि आनंदराव रासकर यांना सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन ‘गुरुरत्न पुरस्कार’ देण्यात आला.

या कार्यक्रमात शितोळे करिअर अकॅडमीत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन गुरुंचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनीही आपल्या अनुभवातून जीवनाला कलाटणी देणारे विचार मांडले.या सोहळ्याला अण्णापुर गावचे ग्रापंचायत सदस्य केशव शिंदे, डॉ. वैशाली साखरे, पवार मॅडम, अश्विनी नरवडे, रुपाली बोर्डे, राधिका, रोहिदास बोरकर,  साहेबराव श्रीमंदिलकर, ललीत खटोड, आदिनाथ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शंकर रासकर (ग्रा.सदस्य अण्णापूर) तसेच शितोळे करिअर अकॅडमी, शिरूर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तेजस फडके यांनी तर आभार केशव शिंदे यांनी मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

23 तास ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

1 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

1 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago