शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावातील कोळपेवाडी, सरकेवस्ती, परीसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या बिबट्याने कोळपेवाडी तसेच आसपासच्या परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ला करत ठार मारले होते. त्यामुळे वनविभागाने कोळपेवाडी परीसरात भाऊसाहेब लिंबा कोळपे यांच्या शेतात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. अखेर मंगळवार (दि. ६) रोजी पहाटे ४ च्या सुमारास अखेर बिबट्या पिंजऱ्यात अडकला.
कोळपेवाडी परिसरात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रात्रीच्या वेळेस उसाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले होते. त्यामुळे पशुपालक,शेतकरी आणि गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे माजी सरपंच गणेश कोळपे तसेच भाऊसाहेब कोळपे यांनी शिरुर येथील वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर आणि वनसेवक नवनाथ गांधले यांच्याशी संपर्क साधत या परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती.
त्यानुसार वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला असल्याने येथील स्थानिक नागरिकांनी बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. परंतु कोळपेवाडी परिसरात अजूनही २ बिबटया पिंजऱ्याशेजारी पाहिल्यामुळे पुन्हा वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी कोळपेवाडी, सरकेवस्ती तसेच गुनाट ग्रामस्थांनी केली आहे.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…