कवठे येमाई, सविंदणे, टाकळी हाजी परिसरात सलग चार घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे आणि टाकळी हाजी परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी दहशत माजवली आहे. केवळ दोन दिवसांत (दि. ४ व ५ ऑक्टोबर) चार वेगवेगळ्या चोरी व लुटीच्या घटना घडल्याने बेट भागात भीतीचे सावट पसरले आहे.
शनिवारी (दि. ४) दुपारी घडलेल्या पहिल्या घटनेत माळवदेवस्ती (कवठे येमाई) येथील ७७ वर्षांच्या पुर्णाबाई भीमा पडवळ या वृद्ध महिलेला गुरे चारत असताना दोन मोटारसायकलस्वार चोरट्यांनी लुटले. हे दोघे तरुण दिशा विचारण्याच्या बहाण्याने जवळ गेले आणि अचानक वृद्धेच्या गळ्यातील ८.५ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि ६ ग्रॅम वजनाचा बदाम आकाराचा दागिना हिसकावून घेतला. पुर्णाबाईंनी आरडाओरडा करत प्रतिकार केला असता चोरट्यांनी त्यांचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या आरडाओरडामुळे मुलगा बाबाजी पडवळ आणि नातू सार्थक धावत येत असल्याचे पाहून चोरटे मिडगुलवाडीच्या दिशेने पळ काढला.
यानंतर पाचच्या सुमारास दुसऱ्या घटनेत सविंदणे येथील सीताबाई बाळासाहेब पोखरकर या महिला रस्त्याच्या कडेला बसल्या असताना त्यांच्या गळ्यातील चार ग्रॅम सोन्याचे मणी हिसकावून दोन चोरटे पसार झाले.
दरम्यान, त्याच रात्री कवठे येमाई येथील ढाकीवस्ती नजीक वास्तव्यास असलेल्या नाथा भगवंत वागदरे आणि त्यांच्या पत्नी लीलाबाई वागदरे यांच्या घरात चोरट्यांनी घुसून हल्ला केला. दोघांनाही डांबून ठेवून ११ शेळ्या, ४ करडे आणि रोख रक्कम असा माल लंपास केला. चोरट्यांनी दाम्पत्याला दोरीने बांधून जबर मारहाण केली, तसेच लीलाबाईंना डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर त्यांनी शेतकरी गणपत सांडभोर यांना माहिती दिली.
रविवारी (दि. ५) सायंकाळी पाचच्या सुमारास टाकळी हाजी गावातील कुंड रस्त्यावर पुन्हा एक घटना घडली. मोटारसायकलवर आलेल्या दोन चोरट्यांनी ताराबाई तबाजी मंदिलकर या वृद्ध महिलेला लुटत त्यांच्या गळ्यातील एक तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि पलायन केले.
दरम्यान, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हवालदार अनिल आगलावे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.सध्या या सलग घटनांमुळे शिरूर तालुक्यातील बेट भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमधून पोलीस गस्त वाढवून चोरट्यांना गजाआड करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…