शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील पोस्ट ऑफीस समोर उक्कडगाव ता. श्रीगोंदा येथील लेबर कॉन्ट्रक्टर मंगेश विठठल महाडिक यांच्या पार्क केलेल्या फोर व्हीलर गाडीतून अज्ञात चोरट्याने २ लाख रुपये लंपास केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. ९) मार्च रोजी दुपारी ३: ३० वा. ते रात्री 9: ४५ वाजल्याच्या दरम्यान शिरूर शहराच्या हद्दीत शिरुर पोष्ट ऑफीस शेजारी फोर व्हीलर गाडी पार्क करून गाडीमध्ये २,०००००/- रुपये गाडी लॉक करून गाडीमध्ये पुढील दोन सिटामधे पिशवीत ठेवुन वरून कपड्याने झाकुन ठेवले होते. ती रक्कम कोणीतरी अज्ञात चोरटयांनी गाडीतून चोरून नेली आहे.
याबाबत शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक विनोद मोरे हे करत आहे. शिरूर शहरात चोरट्यांच्या सुळसुळाट झाला असून वारंवार शहरात चोऱ्या होत आहे. या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हाण शिरूर पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…