शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी चोऱ्यांच्या घटना वारंवार घडत असताना आता चार चाकी वाहने चोरट्यांनी लक्ष केली असून नुकतेच एक इको व एक स्कोर्पिओ कार चोरीला गेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दत्तप्रसाद कॉलनी येथील कुंडलिक भोगाडे यांनी त्यांची एम एच १२ आर टी २३४४ हि इको कार घरासमोर पार्किंग करुन ठेवून झोपले होते, सकाळच्या सुमारास भोगाडे हे उठले असता त्यांना घरासमोर लावलेली इको कार दिसली नाही त्यामुळे त्यांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांची कार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. तसेच शिक्रापूर मलठण फाटा येथील संतोष झुंबड यांनी रात्रीच्या सुमारास त्यांची एम एच १२ टी एस २७६५ हि स्कोर्पिओ कार लॉक करुन घरासमोर लावलेली होती. सकाळच्या सुमारास त्यांना कार नसल्याचे दिसल्याने आजूबाजूला चौकशी केली असता कार चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत संतोष हिम्मतराव झुंबड (वय ३८) रा. आदर्श सोसायटी मलठण फाटा शिक्रापुर ता. शिरुर जि. पुणे व कुंडलिक दगडू भोगाडे रा. दत्तप्रसाद कॉलनी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे स्वतंत्र फिर्यादी दिल्या असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रावण गुपचे व गणेश करपे हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…