शिरूर तालुका

उरळगाव येथून १ लाख ५१ हजारांचे डाळींब माल अज्ञात चोरट्यांनी केला लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील उरळगाव परिसरात अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात डाळींब फळांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, फिर्याद शेतकरी अमोल बाळासाहेब आफळे (वय 32, व्यवसाय – शेती, रा. आफळे वस्ती, उरळगाव, ता. शिरूर) यांनी दिली आहे.

फिर्यादी यांच्या मालकीच्या गट क्रमांक 510 मधील दोन एकर क्षेत्रातील 252 डाळींब झाडांवरील सुमारे 1512 किलो वजनाचा लाल रंगाचा, गोलसर भगवा जातीचा डाळींब माल, दिनांक 21 जून 2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते 22 जून रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्यादीत माहिती दिली आहे. बाजारभावानुसार प्रत्येकी 100 रुपये प्रति किलो दराने या मालाची एकूण किंमत रु. 1,51,200/- इतकी आहे.

या चोरीबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कृषी क्षेत्रातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या घटनेची नोंद दि. 26 जून रोजी सायंकाळी 7:48 वाजता शिरूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भोते करत आहे.. सदर प्रकरणावर शिरूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची कार्यवाही सुरू आहे.

उरळगाव परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे की, अशा चोरीच्या घटना रोखण्यासाठी रात्रगस्ती वाढवाव्यात, शेत परिसरात सुरक्षेची उपाययोजना करावी, तसेच गुन्हा केलेल्या चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago