शिरूर तालुका

पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्यात तरुण गंभीर जखमी

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत येथे बिबटयाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पिंपरखेड (ता. शिरुर) येथे पहाटे 3.30 वाजता अरुण ढोमे यांच्या शेतातील शेतमजुर संजय दुधावडे रा .मुळ गाव पळशी, ता. पारनेर हा तरुण लघुशंका करुण घरात जाताना बिबट्याने मागुन हल्ला केला. तरुण पटकन घरात पळाल्याने थोडक्यात बचावला. तरुणाच्या पायाला वाघाने चावा घेतला असून चांगलीच दुखापत केली आहे.

जांबुत येथील त्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याची नागरीकांकडून मागणी होत आहे. शिरुर तालुक्यात बिबटयाच्या वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांचे अस्तित्व धोक्यात येत असून सध्या शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या नागरीकांना बिबटयाचे दर्शन होत असून बिबट्याच्या हल्ल्यात जांबुत येथील एका बालकासह एका व्यक्तीला जीव गमवावा लागला असून जीवघेणे हल्ले सुरु आहे.

डिंभा, चासकमान धरणाच्या बारमाही पाण्याच्या उपलब्धतेमुळे ऊसशेती मोठया प्रमाणावर होत आहे. याचाच फायदा बिबटयांनी उचलला असून उस शेतीलाच आपले घर समजून जंगल सोडून ठाण मांडले आहे. मादी अनेक पिलांना जन्म देत असल्यामुळे बिबट्यांची संख्या खुप वाढली असून वन विभागाकडे कमी पिंजरे, अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे बंदोबस्त करणे कठिण होत आहे. या नरभक्षक बिबट्याला मानवाच्या रक्ताची चटक लागल्याने तो दुसरी शिकार करत नाही किंवा दुसरे भक्ष्य करत नाही.

करमाळा येथील 3 जणांचा जीव घेतलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यास चंद्रकांत मंडलिक यांनी अहोरात्र मोलाचे सहकार्य करुन जेरबंद केले होते. वनविभागाने तत्परतेने मदत मागितल्यास 2 दिवसांत या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग राबवून बिबट्याला जेरबंद करण्यात लवकरच यश मिळवू, असे मत चंद्रकांत मंडलिक यांनी व्यक्त केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago