क्राईम

शिक्रापुरात खिडकीतून प्रवेश करत चोरी; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात खिडकीतून प्रवेश करत घरातील लॅपटॉप व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 2 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणारे अमोलकुमार तोरडमल हे रात्रीच्या सुमारास मोबाईल चार्जिंगला लावून घरात झोपलेले होते. सकाळच्या सुमारास त्यांनी पत्नीकडे मोबाईल मागितला. त्यावेळी पत्नीला त्यांचा मोबाईल मिळून आला नाही.

त्यामुळे त्यांनी पत्नीच्या मोबाईल वरुन फोन लावून पाहण्यासाठी पत्नीचा मोबाईल पहिला तर पत्नीचा देखील मोबाईल मिळाला नाही. त्यावेळी पाहणी केली असता त्यांच्या घराची खिडकी उघडी असल्याचे तसेच टेबलवरील 2 मोबाईल व लॅपटॉप चोरीला गेल्याचे दिसून आल्याने त्यांनी सोसायटीचे CCTV तपासले असता दोन युवकांनी खिडकीतून प्रवेश करत चोरी केल्याचे निदर्शनास आले.

याबाबत अमोलकुमार भाऊराव तोरडमल (वय ३६) रा. सान्वी रेसिडेन्सी शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. कर्जत ता. कर्जत जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी 2 अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संतोष मारकड हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago