शिरूर तालुका

शिरुर तालुक्यात राज्यपालांच्या विरोधात युवासेनेची स्वाक्षरी मोहीम

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पार पडलेल्या बैठकीत राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेध नोंदवत केंद्र सरकारने राज्यपालांना परत बोलावुन घ्यावे, या मागणीसाठी युवासेना पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राज्यविस्तारक निलेश बडदे यांच्या उपस्थितीत युवासेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. याप्रसंगी युवासेना राज्यविस्तारक निलेश बडदे, युवासेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव, तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपतालुका प्रमुख गोकुळ ढमढेरे, शहरप्रमुख सुनिल जाधव, उपशहरप्रमुख स्वप्नील रेड्डी, संतोष ढमढेरे, नाना गिलबिले, विकास जासुद, आकाश चोरे, संदिप दरेकर, मंगेश भुजबळ, विक्रम ताजणे, शहाजी भंडारे, शहाजी पांडे, संतोष नरवडे, सुदर्शन वागदरे, अमोल पोकळे, सनी गावडे, विजय पंडीत, यश धनी, ज्ञानेश राऊत, गणेश गिलबिले, विकास नरके, सुजीत विरोळे, आकाश सुर्वे, संतोष कांबळे, दादा भिसे, पप्पु खैरे, अमोल आडणे, अमित ढमढेरे, ज्ञानेश्वर शिंदे, अभिषेक सुर्वे यांसह आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान युवासेनेच्या संघटना बांधणीचा आढावा राज्यविस्तारक निलेश बढे व जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव यांनी घेत तळागाळात जाऊन संघटना बांधणीचे काम करण्याचा कानमंत्र पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा तसेच मराठी माणसांचा कायम अपमान करणाऱ्या राज्यपालांचा निषेद नोंदवुन राज्यपालांना केंद्रसरकार ने परत बोलावुन घ्यावे, यासाठी युवासेना शिरुर तालुक्याच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. तर यावेळी युवासेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे यांनी सर्वांचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

हजारो कोटींचा खर्च, तरीही कचऱ्याचा विळखा; मुंबईला आता परिणामकारक प्रशासनाची गरज

मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी…

25 मिनिटे ago

‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! काँग्रेसवरच भडकल्या अंजली दमानिया; सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ भूमिका

काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; "अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही" मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान…

30 मिनिटे ago

प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी मंदिरातील फोटोंवरून वाद; ‘सामान्यांसाठी एक नियम, सेलिब्रिटींसाठी दुसरा?’

गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने…

35 मिनिटे ago

बाळूमामा देवस्थानात 60.75 कोटींचा घोटाळा; गुन्हे दाखल, तरी आरोपी फरार!

आदमापूर (कोल्हापूर): कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा देवस्थानातील तब्बल 60 कोटी 75 लाख…

3 तास ago

पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’

‘राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण मुंबई :…

3 तास ago

ब्लड कॅन्सरचे प्रकार व त्यावरील उपचार

रक्ताच्या कॅन्सरला ब्लड कॅन्सर किंवा ल्युकेमिया असेही म्हणतात. रक्ताचा कर्करोग कोणत्याही वयाच्या व्यक्तीस होऊ शकतो…

3 तास ago