शिरूर तालुका

वाहतूक पोलिसांना सापडलेला मोबाईल मूळ मालकाच्या स्वाधीन

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन सकाळच्या सुमारास जाणाऱ्या एका दुचाकी चालकाचा मोबाईल महामार्ग वाहतूक पोलिसांना सापडला असता सदर मोबाईल मूळ मालकाला परत देण्यात आल्याने मोबाईल मालकाने देखील समाधान व्यक्त केले.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने विवेक खामकर हे त्यांच्या पत्नी सह दुचाकीहून चाललेले असताना त्यांचा मोबाईल रस्त्यावर पडला असत मोबाईल पोलीस नाईक अमोल लांगी यांना सापडला. मात्र सदर मोबाईलला पासवर्ड असल्याने त्यांना कोणाला संपर्क करता आला नाही. मात्र खामकर हे चाकण येथे पोहोचल्यानंतर आपला मोबाईल पडला पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पत्नीच्या मोबाईल वरुन त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला असता अमोल लांगी यांनी सदर मोबाईल आम्हाला सापडला आहे तुम्ही येऊन घेऊन जा असे सांगितले.

त्यामुळे काही तासाने खामकर हे स्वतः सदर ठिकाणी आले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना सापडलेला मोबाईल खामकर यांच्या स्वाधीन केला. यावेळी महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी, पोलीस हवालदार भास्कर, नरसाळे, अभिजित चांदगुडे, अमोल लांगी यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी मोबाईल परत मिळाल्याने विवेक खामकर यांनी देखील समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

9 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

9 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

9 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

14 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

15 तास ago