इतर

साप आणि मांजराची जबरदस्त फाईट, कस झालंय वातावरण टाईट…

दिल्ली: कोब्रा किंवा किरकोळ साप नजरेस पडला तर, माणसाची सोडा प्राण्यांचीही हवा टाईट होते. मात्र, अनेकवेळा साप किंवा कोब्रा प्राण्यांची शिकार करताना चूक करतो आणि ती गोष्ट त्याच्या जीवाशी येते. सध्या सोशल मीडियावर एका साप आणि मांजराच्या घमासान युद्धाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मांजराचं कौतुक केलंय.

नेमकं काय घडलं?

एक मांजर एका मोकळ्या जागेत निवांत झोपलेलं दिसत आहे. तिथे अचानक एक साप येतो आणि तो या मांजरीवर हल्ला करतो. आपल्यासमोर उभ्या असलेल्या या जीवघेण्या संकटाचा मांजरही न घाबरता सामना करतं. सापाने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला ही मांजर चोख प्रत्युत्तर देते. अखेर सापाची अवस्था अशी होते की, त्याला पळ काढावा लागतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा साप कसा या मांजरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आहे. या सापाने केलेल्या प्रत्येक हल्ल्याला मांजर प्रत्त्युत्तर देत आहे. या सापाला बघून मांजर एकदम सतर्क झालेली आहे. सापाचा हल्ला ती चुकवत आहे.

हा साप मांजरावर अनेक वेळा प्रहार करतो पण मांजर खूप हुशार आहे आणि ती त्याचा प्रत्येक हल्ला हाणून पाडते आणि तिच्या हुडावर अनेक चापट मारते. त्यामुळे कोब्रा घाबरुन तेथून पळून जातो. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पाहून नेटकरी या मांजरीच्या धाडसाचे कौतुक करत आहेत.

एका यूजरने सांगितले की, मांजरीने सापाला चांगलाच धडा शिकवला. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, मांजरीचा राग पाहून खात्रीने सापाची हवा टाईट झाली असावी, म्हणून त्याने पळ काढला. आतापर्यंत या व्हिडीओला नेटकऱ्यांनी तुफान प्रतिसाद दिलाय.हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

11 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

15 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

15 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago