इतर

…अन बिबट्याची ती पिल्ले पुन्हा आईच्या कुशीत विसावली

अमरावती: शहरातील महादेव खोरी नजीकच्‍या जंगलात गुरुवार (दि. 1) रोजी बिबट्याचे 2 बछडे आढळून आले होते. आईपासून त्‍यांची ताटातूट झाली होती. बछडे आणि मादी बिबट्याची भेट घडवण्‍यात शनिवार (दि. 3) रोजी पहाटे वनविभागाला यश आले.

दोन दिवसानंतर बिबट्याची ही पिल्‍ले आईच्‍या कुशीत विसावली. गुरुवारी सकाळी नागरिकांना हे बछडे आढळून आले होते. या बछड्यांना वनविभागाच्या पथकाने सुरक्षितरीत्या ताब्यात घेतल्‍यानंतर वडाळी येथील वनउद्यानात ठवेले होते. दोन दिवस या ठिकाणी त्‍यांची देखभाल करण्‍यात आली.

त्‍या दरम्‍यान वनविभागाने या बछड्यांसोबत मादी बिबट्याची भेट घडवून आणण्‍यासाठी प्रयत्‍न सुरु केले होते. शनिवारी सकाळी बिबट्यांच्या या 2 बछड्यांची आईसोबत वनविभागाच्‍या पथकाने भेट घडवून आणली. उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, वनपाल अमोल गावणेर आणि त्‍यांच्‍या चमूने त्‍यासाठी बरेच परिश्रम घेतले. या बछड्यांना आता त्‍यांच्‍या नैसर्गिक अधिवासात आईसोबत राहता येणार आहे.

महादेव खोरी परिसराच्‍या जवळ वनविभागाने वनीकरण केले आहे. पोहरा-मालखेडच्या जंगलाचा हा भाग मानला जातो. गुरुवारी सकाळी काही जणांना या परिसरात बिबट्याचे दोन बछडे दिसून आले होते. या बछड्यांना त्यांच्या जन्मदात्रीकडे परत सोडण्याचे प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे यांनी व्यक्त केली होती. वनविभागाच्‍या या कामगिरीबद्दल यादव तरटे यांनी समाधान व्‍यक्‍त केले आ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

16 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

16 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

17 तास ago