इतर

कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात दिसून येतात हे बदल

मुंबई: कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे फॅट आहे. त्याची निर्मिती लिव्हरमध्ये होते. आपल्या शरीराला याची गरज असते. पण याची निर्मिती गरजेपेक्षा अधिक झाल्यास ते शरीरात जमा होऊ लागते. त्यामुळे अनेक शारीरिक आजारांना निमंत्रण मिळते. रक्तात कोलेस्ट्रॉल वाढू लागल्यास याचा थेट परिणाम हृदयावर होतो आणि हृदयासंबंधित आजार उद्भवू लागतात. कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो. हे त्रास टाळण्यासाठी कोलेस्ट्रॉल वाढल्याची नेमकी लक्षणं आपल्याला समजली पाहिजेत. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या शरीरात काही बदलं तसंच लक्षणं दिसून येतात.

जाणून घेऊया ही लक्षणं कोणती

लवकर थकवा येणे, धाप लागणे
थोडेसे चालल्यावर थकवा जाणवतो का? किंवा धाप लागते का? मग शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा हा इशारा आहे. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

सातत्याने पाय दुखणे
विनाकारण पाय दुखत असतील तर हा कोलेस्ट्रॉल वाढल्याचा संकेत आहे. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

खूप अधिक घाम येणे
घाम येणे सामान्य आहे. पण गरजेपेक्षा अधिक घाम येत असल्यास शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याचा हा संकेत आहे.

अचानक वजन वाढणे
सतत वजन वाढत असल्यास किंवा सतत बॉडी हेव्ही वाटत असल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढले असू शकते.

हृदयाची गती वाढणे
शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढल्याने हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे हृदयाची गती वाढते. हृदयाची गती वाढण्याचा त्रास तुम्हालाही होत असल्यास कोलेस्ट्रॉलची तपासणी करुन घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

12 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

16 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

16 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

17 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

17 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

18 तास ago