Categories: इतर

मुंबईतील सर्व समुद्र किनाऱ्यावर मुलांना जाण्यास रोखण्यासाठी पालिका कर्मचारी नियुक्ती करावेत…

मुंबई: मुंबईतील जुहू कोळीवाडा येथील समुद्रात सायकांळच्या सुमारास पोहायला गेलेली 5 मुले समुद्रात आलेल्या भरतीच्या लाटेत खोल पाण्यात ओढली जावून बुडून त्यांचा मृत्यु झाला आहे. त्यादिवशी समुद्रात भरती असल्याने मुलाना खोल पाण्याचा अंदाज आला नाही त्यामुळे ते समुद्रात अर्ध्या किमी आतमध्ये ओढले गेल्याने त्या चार मुलाचा दुदैवी मृत्यू झाला आहे.

या घटनेबाबत त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या धर्तीवर शासनाने नागरिकांनी समुद्रात जावू नये असे अर्लट जारी केले असतानाही ही मुले समुद्रकिनाऱ्यावर पोहावयास गेली. या मुलांना महानगरपालिकेच्या जीवरक्षकाने तसेच, समुद्राच्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या पालिका कर्मचारी यांनी अनुमती नसताना समुद्रात जाण्यास मज्जाव केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी उपरोक्त घटनेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, चहल यांना उपसभापती कार्यालयातून पत्र पाठविले आहे. पत्रात त्यांनी मुलाना समुद्रात जाण्यास जीवरक्षकाने मज्जाव का केला नाही?, लाटेच्या जवळ जाणाऱ्या मुलाना रोखण्यासाठी कर्मचारी कर्तव्यात का नव्हते? असे प्रश्न उपस्थित केले आहे. तसेच, येणाऱ्या पावसाळयामध्ये किनाऱ्यावरती असे प्रकार घडणार नाही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात व केलेल्या उपाययोजनाचा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवावा असे पत्रात नमूद केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

6 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

6 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

11 तास ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

16 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

1 दिवस ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

2 दिवस ago