Categories: इतर

पितृपंधरवडा आजपासून सुरु, जाणून घ्या श्राद्ध पद्धत, विधीचे महत्त्व…

पुणे: पितृपक्षाचा महिना सुरु झाला आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला खूप महत्त्व आहे. अशी मान्यता आहे की, या दिवसांत आपल्या प्रियजनांना भेटण्यासाठी पूर्वज यमलोकातून पृथ्वीवरील येतात. त्यामुळे त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पितृपक्षात तर्पण आणि श्राद्ध केले जाते. हिंदू धर्मानुसार असे मानले जाते की, जर पितरांसाठी श्राद्ध केले तर पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरात सुख-समृद्धी येते.

जाणून घ्या पितृपक्षाबाबत

यंदा पितृपक्ष 10 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. तर, रविवारी 25 सप्टेंबरला पितृपक्षाची समाप्ती होईल. पितृपक्ष हा 15 दिवसांचा कालावधी आहे. जो हिंदू कॅलेंडरनुसार भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. कृष्ण पक्षातील अमावास्येला त्याची समाप्ती होते. या कालावधीला पितृपक्ष पंधरवडा तसेच श्राद्धपक्ष म्हणतात. या दरम्यान पिंड दान आणि तर्पण हे तारखेनुसार केले जातात. पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी या दिवसांत श्राद्ध आणि तर्पण केले जाते. असे मानले जाते की, पितृपक्षातील श्राद्ध विधीने पितरांना मोक्ष मिळतो.

पाच विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम…

शास्त्रानुसार पितृपक्षात श्राद्धासाठी तयार करण्यात आलेल्या 5 विशेष प्रकारच्या जीवांना भोजन देण्याचा नियम आहे. यासाठी सर्व प्रथम ब्राह्मणांसाठी शिजवलेले अन्न 5 भागांमध्ये काढून सर्वांचे वेगवेगळे मंत्र जपत, प्रत्येक भागावर अखंड ठेवून पंचबली अर्पण केली जाते.

पिंडदान आणि तर्पण पद्धत काय आहे?

पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध केले जाते.

पिंडदान आणि तर्पण श्राद्ध पक्षाच्या दिवसात कोणत्याही दिवशी करता येते.

श्राद्ध कालावधी या वर्षी 25 सप्टेंबर रोजी संपणार आहे.

श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती स्नान करून कुश गवताची अंगठी घालून नवीन वस्त्रे परिधान करतात.

एक लाकडी टेबल पांढऱ्या कापडाने झाकून दक्षिणेकडे तोंड करुन ठेवलेले असते.

ज्यावर पूर्वजांचे छायाचित्र ठेवलेले असते.

या विधीत काळे तीळ आणि जवसच्या बियांचा उपयोग केला जातो.

पिंड पूर्वजांना तांदूळ किंवा गव्हाच्या गोळ्यांच्या रूपात अर्पण केले जातात.

पिंड हे मध, तांदूळ, गहू, बकरीचे दूध, साखर आणि तूप यापासून बनवले जाते.

यानंतर जल, मैदा, जवस, कुश आणि काळे तीळ मिश्रित तर्पण अर्पण केले जाते.

श्राद्ध आणि तर्पण विधी झाल्यानंतर गरीबांना अन्नदान केले जाते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

1 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

2 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

3 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

19 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

23 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

23 तास ago