क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल

विरार: लग्नाचे आमिष दाखवत तब्बल दोन वर्षे एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मिरारोड येथील काशिगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पीडित तरुणी ही विरार परिसरात आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी तिची मिरारोडच्या काशिगाव भागात राहणाऱ्या मोहम्मद एहसान अन्सारी (वय २६) याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला मैत्रीच्या माध्यमातून दोघांमध्ये जवळीक वाढली. त्यानंतर आरोपीने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे खोटे आश्वासन दिले आणि तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

या संपूर्ण कालावधीत आरोपीने सतत लग्नाचे आश्वासन देत तरुणीचा विश्वास संपादन केला. मात्र, दोन वर्षे उलटूनही लग्नाबाबत कोणतीही ठोस पावले उचलली जात नसल्याने तरुणीला संशय आला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिने काशिगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago