मुंबई: महिलांसाठी महत्त्वाकांक्षी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. जानेवारी महिना संपून एक आठवडा उलटून गेला तरीही हप्ता न मिळाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा १ हजार ५०० रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत एकूण १७ महिन्यांचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले असून, त्याद्वारे प्रत्येक महिलेला २५ हजार ५०० रुपये मिळाले आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळाल्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, जानेवारीचा रखडलेला हप्ता आणि चालू फेब्रुवारी महिन्याचा हप्ता एकत्रित मिळणार का, याबाबत महिलांमध्ये उत्सुकता आहे. मात्र यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये ही योजना सुरू केल्यानंतर ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती. मात्र मागील दोन ते तीन महिन्यांत अनेक महिलांना हप्ते मिळाले नाहीत. शासनाकडून काही लाभार्थी महिलांची नावे अपात्र ठरवून वगळण्यात आली आहेत.
चारचाकी वाहन असणे, एकाच रेशनकार्डवर तीनपेक्षा अधिक नावे असणे, तसेच ‘केवायसी’ प्रक्रियेदरम्यान चुकीची माहिती भरली जाणे, या कारणांमुळे अनेक महिलांना योजनेतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर अपात्रतेच्या निकषांवरून मागील दोन महिन्यांपासून चर्चा सुरू आहे.
फेब्रुवारी महिना सुरू होऊनही अद्याप हप्ता न मिळाल्याने, जानेवारीचा विलंब म्हणजे पुन्हा नाव वगळण्याची नांदी तर नाही ना? अशी शंका अनेक लाभार्थी महिलांकडून व्यक्त केली जात आहे. सरकारकडून याबाबत लवकरच स्पष्ट भूमिका मांडली जाण्याची अपेक्षा महिलांकडून व्यक्त होत आहे.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…