क्राईम

शिरुर तालुक्यात शाळकरी युवतीचा विनयभंग करणारा अटक

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथे शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन युवतीला कार मध्ये घेऊन जात तिचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सरफराज शकील इनामदार या युवकावर गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील अल्पवयीन युवती क्लासला जाण्यासाठी थांबलेली असताना गावातील सरफराज इनामदार हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ डी एफ ९९३० हि कार घेऊन सदर ठिकाणी येऊन तुझ्या भावाने तुला बोलावले आहे माझ्या सोबत चल, असे युवतीला म्हणून तिला कार मध्ये बसवून घेऊन गावातील चौधरी वस्ती येथे घेऊन जात युवतीचा हात पकडून युवतीचा विनयभंग केला. दरम्यान युवतीने मी माझ्या घरच्यांना सांगेल मला सोड असे म्हटले असता मी तुला गाडीमध्ये घेऊन आलो हे कोणाला सांगू नको नाहीतर याद राख अशी धमकी दिली.

याबाबत पिडीत युवतीच्या आईने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी सरफराज शकील इनामदार (वय २२) रा. चौधरी वस्ती पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करत त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

3 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago