Crime
शिरसगाव काटा येथील घटना
शिक्रापूर: शिरसगाव काटा (ता. शिरुर) येथे अशोक जाधव व पोपट जाधव यांची शेजारी शेजारी शेती असून पोपट जाधव याने शेजारील शेतातील पाण्याची सारण फोडली. त्यामुळे अशोक याने तू शेतातील सारण का फोडतोस असे विचारले. त्यामुळे पोपटयाने चिडून जाऊन अशोक व त्याच्या आईला शिवीगाळ, दमदाटी करत अशोकच्या आईला ढकलून देत अशोकला खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करत जखमी करुन अशोकचा मोबाईल फोडून नुकसान केले.
याबाबत अशोक जगन्नाथ जाधव (वय ३८) रा. शिरसगाव काटा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी पोपट संपत जाधव रा. शिरसगाव काटा (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साबळे हे करत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…