क्राईम

पोलिस महिलेस ब्लॅकमेल, माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा…

बीड: माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, अशी धमकी देत महिला अंमलदारास अश्लील मेसेज पाठवून ब्लॅकमेल करणाऱ्या अंमलदारास पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी १३ सप्टेंबरला निलंबनाचा दणका दिला. माजलगाव येथे १० सप्टेंबरला ही घटना घडली होती. हरिश्चंद्र खताळ, असे निलंबित अंमलदाराचे नाव आहे.

हरिश्चंद्र खताळ व पीडित महिला अंमलदार ग्रामीण ठाण्यात कार्यरत आहेत. २०२१ पासून ते २७ ऑगस्ट २०२२ पर्यंत हरिश्चंद्र खताळ याने व्हॉटसअॅप मेसेज करून या महिलेस त्रास दिला. ८ सप्टेंबरला रात्री घरी येऊन माझी इच्छा पूर्ण कर, अन्यथा मी फाशी घेईन, असे म्हणत धमकावून विनयभंग केला होता. त्यानंतर त्याची पोलीस पत्नी शिवकन्या निंगुळे हिने पैसे घेऊन प्रकरण मिटवून टाक नाही तर तुझ्यावर, तुझ्या नातेवाईकांवर ३०६ नुसार गुन्हा दाखल करून तुझी बदनामी करीन, तुला कुठे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही, अशी धमकी दिली होती.

पीडित महिला अंमलदाराच्या फिर्यादीवरून पो.कॉ. हरिश्चंद्र खताळ व पो.ना. शिवकन्या निंगुळे या दाम्पत्यावर शहर ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली होती. गैरवर्तन केल्याचा ठपका ठेऊन पो.कॉ. हरिश्चंद्र खताळवर निलंबनाची कारवाई केली. १३ रोजी याबाबतचे आदेश काढल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला; ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांचे निधन

मुंबई: मराठी भाषा, व्याकरण आणि भाषाशास्त्राच्या क्षेत्रात प्रदीर्घ आणि समर्पित कार्य करणाऱ्या ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व…

3 तास ago

भाजपला मोठा धक्का! मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर भाजपमध्ये बंडाची ठिणगी

कल्याण-डोंबिवली : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी…

3 तास ago

भोंदू मनोहर भोसले प्रकरण! माया झोळसह तिघे न्यायालयीन कोठडीत

बार्शी : भोंदू मनोहर भोसले याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याच्या आरोपातून अटक करण्यात आलेल्या दत्त कला…

3 तास ago

अमरावतीत नवजात शिशू अतिदक्षता विभागाला भीषण आग; तीन बाळांचा मृत्यू

अमरावती : अमरावती जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागाला सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास…

3 तास ago

बावनकुळेंचे वडेट्टीवारांकडून कौतुक; ‘2029 ला आमचा नंबर लागला तर माझी तारीफ करा’

कोल्हापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यशैलीचे आणि…

4 तास ago

साखरेच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला फटका

उत्पादन घट, आयात आणि साठेबाजीच्या आरोपांनी सरकारसमोर प्रश्न मुंबई : देशातील साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या…

4 तास ago