जळगाव: जळवागात १५ सप्टेंबर मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी याबाबतचे आदेश रात्री उशिरा काढले आहेत. मराठा समाजाविषयी बकालेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी बकालेंविरुध्द कठोर कारवाई करण्यासंदर्भात विशेष पोलीस महानिरीक्षकांना प्रस्ताव पाठविला होता. याच बरोबर बकालेंना तडकाफडकी पदावरून बाजूला सारत नियंत्रण कक्षात जमा केले होते. मात्र विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी किरणकुमार बकाले यांना निलंबित कारण्याचे आदेश काढले आहेत.
बकालेंविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरुपाच्या प्राथमिक चौकशी सुरु करण्यात आली असून, सदरचे प्राथमिक चौकशीत बाधा आणू नये, फेरफार करु नये, ती पारदर्शकरित्या व्हावी. साक्षीदारांवर दबाव आणू नये किंवा प्रलोभन दाखवू नये सुरू करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीचे अनुषंगाने बकाले यांना “शासकीय सेवेतून निलंबित” करण्याचे आदेशात म्हटले आहे.
निलंबन काळात बकाले यांचे पोलीस मुख्यालय हे नाशिक ग्रामीण राहणार आहे. तसेच त्यांना पोलीस उप अधीक्षक (मुख्या), नाशिक ग्रामीण यांच्याकडे दररोज नियमित हजेरी देण्यासह कोणत्याही परिस्थीतीत पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण यांच्या लेखी परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जावू नये. सदर आदेशाचे पालन केले नाही तर विनापरवाना मुख्यालय सोडले असे मानण्यात येवून वेगळी शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल, अशा सक्त सूचना बकाले यांना देण्यात आल्या आहेत.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…