शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान भावाला बेदम मारहाण केल्याची घटना शिरूर तालुक्यातील गुनाट येथे घडली.
याबाबत गुनाट येथील शेतकरी संदीप कारभारी कोळपे (वय ३८) यांनी शिरूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शनिवारी (दि. ७) सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास संदीप कोळपे हे घरी असताना त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब कारभारी कोळपे व भावजय सोनाली भाऊसाहेब कोळपे हे त्यांच्या घरासमोर आले.
सामाईक असलेली इलेक्ट्रिक मोटार घरी का आणली, असा जाब विचारत दोघांनी वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावर संदीप यांनी मोटार आता कोणीही वापरणार नसल्याचे सांगितल्याने आरोपी संतापले. त्यानंतर त्यांनी शिवीगाळ व दमदाटी करत संदीप यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच हातातील दगडाने त्यांच्या डोक्यात मारून जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात संदीप कोळपे यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टेंगले करीत आहेत.
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…