क्राईम

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना कवठे यमाई हद्दीतील इचकेवाडी येथे घडली आहे.

याबाबत कवठे यमाई (ता. शिरूर) येथील रहिवासी सुहास अनिल इचके (वय ३५, व्यवसाय-शेती) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ३१ मे रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून ते ५ जून रोजी सायंकाळी ५.२५ वाजेपर्यंतच्या कालावधीत हा प्रकार घडला.

फिर्यादीनुसार, आरोपी दिपक बरवे (पूर्ण नाव माहित नाही, मूळ रा. सोनपेठ, ता. सोनपेठ, जि. परभणी, सध्या रा. कवठे यमाई, ता. शिरूर) याने फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली होती तसेच शेतात ट्रॅक्टर घातल्याचा आरोप होता. याबाबत जाब विचारण्यासाठी सुहास इचके व त्यांची आई सुनिता अनिल इचके हे आरोपीच्या घरासमोर गेले होते.

यावेळी आरोपीने संतापून सुनिता इचके यांच्या डोक्यात व डाव्या खांद्यावर लोखंडी वस्तूने वार करून मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा डावा खांदा फ्रॅक्चर झाला असून डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात ७ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार उबाळे पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

9 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

13 तास ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

13 तास ago

यकृत तंदुरुस्त ठेवण्याच्या टिप्स

हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्‍याने…

13 तास ago

भाजप-आरएसएसचा फॅसिस्ट विचार देशासाठी घातक’; संविधान बचाव कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…

13 तास ago

चला शाळेत जाऊया’ अभियानातून शाळांचा सर्वांगीण विकास

गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…

14 तास ago