औरंगाबाद: सुरक्षतेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन लेनमध्ये दुभाजक करण्यात येतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आपापल्या लेनवरून प्रवास करतांना दुसऱ्या बाजूच्या येणाऱ्या वाहनांचा धोका किंवा अपघात होऊ नयेत म्हणून मध्यभागी दुभाजक तयार करण्यात येतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही व्यावसायिकांनी महामार्गावरील आपल्या दुकानात ग्राहकांनी सहजपणे यावे यासाठी चक्क महामार्गावरील लेनच्यामध्ये असलेले दुभाजक तोडून वळण रस्ता तयार केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी अशा 15 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहे. ज्यामध्ये पाच वर्षापर्यंत कारावासासह आर्थिक दंडाची शिक्षा प्रस्तावित आहे.
या व्यावसायिकांवर गुन्हे दाखल…
कन्नड ग्रामीण पोलीस ठाणे:
हॉटेल मावली, हॉटेल शिवराज, हॉटेल अशोक, हॉटेल आबाचा वाडा, हॉटेल श्रीमुर्ती, गर्जे फार्म हाऊस, हादगाव वॉशिंग सेंटर सर्व कन्नड हायवे वरिल आहेत.
खुलताबाद पोलीस ठाणे:
हॉटेल आम्रपाली, हॉटेल रोहीणी सर्व कसबाखेडा ते पळसवाडी या महामार्गावरीलआहेत.
गंगापुर पोलीस ठाणे:
हॉटेल बटर फलाय (जुने कायगाव), हॉटेल लोकसेवक, गांधी पेट्रोल पंप, हॉटेल जिजावु, गॅनोज कंपनी, एच.पी. पेट्रोलपंप, हॉटेल इंडियन ढाबा, ग्रामपंचायत ढोरेगाव
पाचोड पोलीस ठाणे:
आडुळ बायपास जवळ माऊली लॉन्स समोर रजापुर, डाभरुळ गावा जवळ अज्ञात व्यक्तीविरोध्दात.
करमाड पोलीस ठाणे:
औरंगाबाद ते जालना रोडवर करमाड गावाजवळील रोडवरील दुभाजक अज्ञात व्यक्ती विरूध्द. महामार्ग व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माध्यमांतून हे गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कारवाई पुढे अशीच सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी दिली आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…
पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…
सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…
जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…
पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…
शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…