क्राईम

शिरुर शहरात भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर (ता. शिरुर) येथील काचे आळी येथे सुरु असलेली भांडणे सोडवायला गेलेल्या महिलेच्या डोक्यात बाटली फोडून महिलेला मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिरुर येथील काचे आळी येथील सुरेखा परदेशी हि महिला घरात असताना घराबाहेर गोंधळ सुरु असल्याचा आवाज आल्याने सुरेखा या बाहेर आल्या. त्यावेळी सागर मल्लाव व महेश मल्लाव यांच्यात वाद सुरु होते त्यामुळे सुरेखा यांनी मध्यस्ती करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केले असता सोनाली मल्लाव हिने तू मध्ये का पडतेस असे म्हणत दमदाटी करुन सुरेखा यांना हाताने मारहाण करण्यास सुरवात केली.

दरम्यान महेश मल्लाव याने शेजारी पडलेली काचेची बाटली सुरेखा यांच्या डोक्यात फोडून त्यांना जखमी करत मारहाण केली. याबाबत सुरेखा गजेंद्र परदेशी (वय ४०) रा. काचे आळी शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी सोनाली महेश मल्लाव, महेश शिवाजी मल्लाव दोघे रा. काचे आळी शिरुर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रतापराव टेंगले हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago