क्राईम

जागेत प्रवेश करत उद्योजकास दमदाटी व जीवे मारण्याची धमकी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे बालविवाह प्रकरणी तक्रार करणाऱ्या तक्रार दारासह 10 ते 15 जणांवरच आता एक महिन्यापूर्वी पत्राशेडमध्ये घुसून शिवीगाळ, दमदाटी करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबत मुकेश पोपट भुजबळ, मनोहर पोतले, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर यांच्या विरुद्ध शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गालगत रवींद्र भुजबळ यांच्या मालकीच्या जागेमध्ये त्यांनी यापूर्वी हॉटेल साठी पत्राशेड मारलेले आहे, कोरोनानंतर सदर हॉटेल बंद अवस्थेत आहे, तर १३ ऑक्टोबर २०२२ रोजी बालविवाह प्रकरणी तक्रार करणारा तक्रारदार मुकेश भुजबळ हा त्याच्या एम एच १२ एम एल ४०१० या कार मधून आला त्यावेळी एम एच १२ पी टी ९३३३ तसेच एम एच १४ एफ एक्स ०३६२ या कार मधून मनोहर पोतले, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर यांच्यासह अनोळखी 10 ते 12 व्यक्ती हातामध्ये काठ्या व लोखंडी गज घेऊन सदर ठिकाणी आले.

त्यांनी रवींद्र भुजबळ यांचा मुलगा राजेश भुजबळ यास हि जागा आमच्या मामाच्या मालकीची आहे, तुमचा येथे काहीही संबंध नाही, असे म्हणत हॉटेल मधील साहित्यांची तोडफोड करत राजेश यास तू मधी आलास तर तुला जीवे मारील अशी धमकी देत धक्काबुक्की केली तसेच मुकेश भुजबळ याने माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार केली तर तुझ्या बापाचा मुडदा पाडील अशी धमकी दिली असल्याचे म्हटले आहे.

याबाबत राजेश रवींद्र भुजबळ (वय ३0) रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी मुकेश पोपट भुजबळ रा. सणसवाडी (ता. शिरुर) जि. पुणे, मनोहर पोतले रा. करंदी (ता. शिरुर) जि. पुणे, अमोल नप्ते, दत्तात्रय सांडभोर रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांच्यासह अनोळखी दहा ते बारा इसम यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रविकिरण जाधव हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; रस्त्यातील दुचाकी काढण्यास सांगितल्याने सात जणांनी शेतकऱ्याला मारहाण करत कारच्या काचा फोडल्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रस्त्याच्या मध्यभागी उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरुन काही गुंड…

2 तास ago

अजितदादांच्या विमान अपघाताचे सत्य समोर आणणारच! जय पवारांचा निर्धार; CID तपासाचा घेतला आढावा

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते जय अजितदादा पवार यांनी आज पुण्यातील सीआयडी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांची…

4 तास ago

महाराष्ट्राला ‘झाडखाऊ’ मुख्यमंत्री नको! टोरंट प्रकल्पावरून हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर घणाघात

‘विकासाला विरोध नाही, विनाशाला विरोध’; कर्जत-भीमाशंकरमधील वृक्षतोडीची उद्या सपकाळ करणार पाहणी मुंबई: कर्जत-भीमाशंकर परिसरात प्रस्तावित…

4 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल! उमेश पाटील राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते, झिशान सिद्दीकींकडे मुंबईची धुरा

सुनेत्रा पवारांकडून नियुक्त्यांची घोषणा; पार्थ पवारांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात महत्त्वाच्या संघटनात्मक…

4 तास ago

शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींना हात लावाल तर रस्त्यावर उतरू; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गडचिरोली : प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचे अधिग्रहण करण्यास विरोध करत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय…

4 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीच्या पाण्यावरून वाद पेटला; दगड अन् कुऱ्हाडीने मारहाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात सामाईक विहिरीवरील पाण्याची मोटार बंद केल्याचा जाब विचारणे आणि…

9 तास ago