क्राईम

जन्मदात्या वडिलांनीच विष पाजून दोन चिमुकल्यांचा गळा आवळून केला खुन…

वरोरा: जन्मदात्या वडिलाने आपल्या 2 चिमुकल्या मुलांना आधी विष पाजले. त्यानंतर त्यांचा गळा आवळून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. २) रोजी सायंकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार वडिलाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करुन शोध सुरु केला आहे. संजय श्रीराम कांबळे (वय ४०) असे वडिलाचे, तर सुमित (वय ७), मिस्टी (वय ३) अशी मृत चिमुकल्यांची नावे आहेत.

तालुक्यातील बोर्ड येथे संजय कांबळे हे कुटुंबीयांसह राहतात. खासगी शिकवणी हा त्यांचा व्यवसाय होता. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी पनिता (वय. ३५) ही एका महाविद्यालयात कंत्राटी स्वरुपात नोकरीवर जात होती. त्यांच्या संसारवेलीवर सुमित (वय. ७), मिस्टी (वय. ३) अशी 2 फुले उमलली होती. सुखात संसार सुरु होता.

परंतु, मागील काही दिवसांपासून संजय कांबळे यांची मानसिकस्थिती बिघडली होती. यामुळे शिकवणी वर्ग बंद होण्याच्या मार्गावर होते. शुक्रवारी सकाळी पत्नी पनिता ही कॉलेजमध्ये कामानिमित्त गेली होती. सुमित आणि मिस्टी ही 2 मुले वडिल संजय कांबळे यांच्यासोबत घरी होती. सायंकाळी पनिता कांबळे या घरी आल्या. घराचा मुख्य दरवाजा लावलेल्या स्थितीत होता. परंतु, पतीची चपल तिथे नव्हती. त्यामुळे ते बाहेर गेले असावे, असे तिला वाटले.

त्यानंतर घराचा दरवाजा उघडून बघितले असता तिला मोठा धक्का बसला. दोन्ही मुले बेडवर पडलेली होती. तोंडातून फेस बाहेर आलेला होता. तिच्या ओरडण्याने शेजारच्या नागरिकांनी धाव घेतली. तातडीने दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी दोन्ही मुलांना मृत घोषित केले. या दोन्ही मुलांना आधी विष दिले. त्यानंतर गळा आवळून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेची तक्रार वरोरा पोलिसांत करण्यात आली. पोलिसांनी वडिल संजय कांबळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

6 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

10 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

12 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago