क्राईम

महामार्गावर दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश…

पुणेः बंदुकीचा वापर करत फायरींग करून ३,६०,००,००० रूपयांचा दरोडा टाकणाऱ्या टोळीचा ७२ तासांत पर्दाफाश करण्यात आला असून, ६ आरोपींसह ३,४४,३०,००० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी भावेशकुमार अमृत पटेल (रा. कहोडा, ता.उंझा, जि. मेहेसाना, राज्य गुजरात) व्यवसाय कुरीअर सर्व्हिसेस वितरक हे नांदेड, लातूर व सोलापूर येथील पार्सल घेवून २६/०८/२०२२ रोजी पहाटेच्या वेळी सोलापूर येथून मुंबई येथे जाणेसाठी निघाले होते. इंदापूर टोल नाका पास करून पुढे वरकुटे पाटी येथील गतीरोधक जवळ गाडीचा वेग कमी झाल्याने पहाटे ०२:३० वा. सुमारास ६ अनोळखी जणांनी फिर्यादीचे गाडीजवळ येवून त्यांना लोखंडी रॉड दाखवत अडविण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी त्यांना त्यांची गाडी भरधाव वेगाने पुढे काढली त्यावेळी त्यांचे गाडीचा दोन चारचाकी वाहनांनी पाठलाग सुरू केला. वरकुटे पाटी पासून पुढे सात ते आठ किलोमीटर अंतरावर पोहोचले नंतर पाठलाग करणारे गाडीतून फिर्यादीचे स्कार्पिओ गाडीवर गोळीबार केला. त्या दरम्यान पाठलाग करणारे एका चारचाकी वाहनाने स्कॉर्पिओ गाडीला आडवी मारून स्कॉर्पिओ थांबविली. त्यावेळी एकूण सहा अनोळखींनी फिर्यादीस व त्याच्या सोबत असणारे विजयभाई सोलंकी यांस मारहाण करून फिर्यादीला स्कॉर्पिओ मधून उतरवून त्यांचेकडील दुसऱया गाडीत बसविले. त्यानंतर पुढे नेवून यांच्या गाडीमध्ये ठेवलेली सर्व रोख रक्कम फिर्यादी व सोबतचे मोबाईल व त्यांचे खिशातील रोख रक्कम असे एकूण तीन कोटी साठ लाख सव्वीस हजार रूपयांचा माल दरोडा टाकून चोरून नेला होता. त्यानंतर फिर्यादी व चालक यांना स्कॉर्पिओसह स्वामी चिंचोली गावाचे परीसरात सोडून दिले होते. झालेल्या प्रकरणावरून फिर्यादी यानी इंदापूर पोलिस स्टेशन गु.र.नं ६६७/२०२२, कलम ३९५, ३९७,३६४ अ, आर्म अॅक्ट ३,५,२५ म.पो. अधि. १३५ अन्वये २६/०८/२०२२ रोजी गुन्हा दाखल होता.

ranjangaon-mutadwar-darshan

सोलापूर-पुणे या मुख्य हायवे रोडवर फायरींग करून दरोडयाचा प्रकार झालेला असल्याने सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापुर पोलिस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखा यांनी संयुक्त कामगिरी करताना अथक परीश्रमानंतर ७२ तासाच्या आत १) सागर शिवाजी होनमाने, वय ३४ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, २) बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकांत कदम, वय ३२ वर्षे, रा. कुर्डुवाडी, ता. माढा, जि. सोलापूर, ३) रजत अबू मुलाणी, वय २४ वर्षे, रा.न्हावी, ता. इंदापूर यांना ताब्यात घेतले होते. सदर आरोपींकडे केलेल्या अधिक तपासात १) सागर शिवाजी होनमाने याच्याकडून ७२ लाख रूपये रोख, २) रजत अबू मुलाणी, याचेकडुन ७१ लाख २० हजार रूपये, असे एकुण १,४३,२०,००० रूपये जप्त करण्यात आला आहे.

त्यादरम्यान अटक आरोपींकडील प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा व इंदापुर पोलिस स्टेशनचे प्रत्येकी एक असे दोन पथक तात्काळ राजस्थान येथे रवाना करण्यात आले होते. त्या पथकाने गुन्हयातील सहभाग असणारे आरोपी नामे १) गौतम अजित भोसले, वय ३३ वर्षे, रा. वेने, ता. म्हाडा, जि. सोलापुर, २) किरण सुभाष घाडगे, वय २६ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि.पुणे, ३) भुषण लक्ष्मीकांत तोंडे, वय २५ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापुर, जि.पुणे यांना राजस्थान उदयपुर येथील प्रतापनगर पोलिस ठाणे हद्दीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजस्थान येथून ताब्यात घेवुन दिनांक ०१/०९/२०२२ रोजी अटक करण्यात आले होते. सदर आरोपींकडुन अनुकमे १) गौतम अजित भोसले, वय ३३ वर्षे, रा. वेनेगाव, ता. म्हाडा, जि. सोलापूर यांचेकडुन ७१,६०,०००/- रूपये, २) किरण सुभाष घाडगे, वय २६ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर, जि.पुणे याचेकडुन ६०,००,००० /- रूपये, ३) भूषण लक्ष्मीकांत तोंडे, वय २५ वर्षे, रा. लोणीदेवकर, ता. इंदापूर जि. पुणे याचेकडु ६९,५०,००० /- रूपये, २,०१,१०,०००/- रूपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अद्यापर्यंत सदर गुन्हयात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यापैकी पाच आरोपींकडुन एकुण ३,४४,३०,००० /- रूपये इतका मुद्देमाल मिळवण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, इंदापुर पोलिस स्टेशन व त्यांचे पथक करीत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago