मुंबई: सोशल मीडियावर आपल्याला प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. ज्यांमध्ये साप, वाघ, सिंह, मगर सारखे प्राणी असतात. या प्राण्यांचे व्हिडीओ हे असे काही व्हिडीओ असतात. जे आपल्या हृदयाचा ठोका चुकवतात.
सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो सापाचा आहे. परंतू हा कोणता साधा साप नाही तर तो कोब्रा साप आहे. किंग कोब्रा हा इतका खरतनाक असतो की त्याचा दंश होताच व्यक्ती मरतो. कारण तो इतर सापांपेक्षाही खूपच विषारी आहे. ज्यामुळे त्याच्यापासून लांबच राहिलेलं बरं. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण किंग कोब्रा सोबत खेळत आहे. तो आधी एका पिशवीतून सापाला बाहेर काढतो आणि मग त्याच्या शेपटीला पकडून त्याच्यासोबत खेळू लागतो आणि या सापाबद्दल माहिती सांगू लागतो.
त्यानंतर हा तरुण सापाला मधून पुन्हा उचलतो आणि तो लोकांना असं न करण्यासाठी देखील सांगतो. हे दृश्य पाहतानाच आपल्याला इतकं भयानक वाटत आहे. परंतू या तरुणाला याचं काहीही नाही, तो अगदी आरामात या सापासोबत खेळत असतो. अखेर हा तरुण सापाला खाली ठेवतो आणि मग त्याच्या अवतीभवती फिरु लागतो.
ज्यानंतर हा किंग कोब्रा या तरुणाला टार्गेट करतो आणि तो जसा-जसा फिरतोय तसा फिरु लागतो. तो ही अगदी अटॅकिंग पोजिशनमध्ये असतो. हे पाहून आपल्यालाच धडकी भरेल. पुढे जेव्हा हा तरुण त्या सापाला सोडून देण्याचा विचार करतो, तेव्हा हा साप असा काही माग वळतो की, एका सेकंदात या तरुणाचा खेळ खल्लास होणार असतो.
परंतु तेवढ्याच चलाखीने हा तरुण मागे होतो. ज्यामुळे त्याचे प्राण वाचतात. हा किंग कोब्रा पुन्हा एकदा अटॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि नशीबानं दुसऱ्या वेळी देखील हा तरुण वाचतो. हा व्हिडीओ ओडीसाचा असल्याचे सांगितले जात आहे. जो युट्यूबवर Murliwale Hausla नावाच्या अकाउंटवरुन अपलोड करण्यात आला आहे. ज्यावर लोकांना या व्हिडीओ लाईक आणि कमेंट केले आहेत.
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…