क्राईम

कोंढापुरीत विरुद्ध दिशेने पिकअप आल्याने चार वाहने आदळली अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): कोंढापुरी (ता. शिरुर) येथे विरुद्ध दिशेने एक पिक अप आल्याने चक्क चार वाहने एकमेकांवर आदळून अपघात होऊन अपघातात चारही वाहनांचे नुकसान झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे पिकअप चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

कोंढापुरी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरून शंकर इंगळे हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४६ बी के २७१३ हि कार घेऊन पुणे बाजूने अहमदनगर बाजूकडे जात असताना समोरुन विरुद्ध बाजूने एम एच १२ एच डी ८९६६ हा पिक अप चालक आला त्यामुळे इंगळे यांच्या समोर चाललेली एम एच १२ क्यू जि ९११२ हि बस थांबली त्यामुळे इंगळे देखील थांबले. त्यावेळी पाठीमागून आलेली एम एच १२ क्यू के ७२५५ हि बस इंगळे यांच्या कारला पाठीमागून धडकली याच वेळी पाठीमागील बसला देखील एम एच १२ क्यू जि ०११२ या टेम्पोची धडक बसून अपघात झाला.

यावेळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या मात्र कोणालाही काही इजा झाली नाही, परंतु सदर अपघातात चार वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, घडलेल्या प्रकाराबाबत याबाबत शंकर विश्वनाथ इंगळे (वय ३२) रा. लक्ष्मी नगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी एम एच १२ एच डी ८९६६ या पिकअप वरील अज्ञात वाहन चालकावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

1 तास ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

4 तास ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

15 तास ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

16 तास ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

17 तास ago

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात…

18 तास ago