शिक्रापूर (शेरखान शेख): आरणगाव (ता. शिरुर) येथील फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेला पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने नुकताच आदर्श प्राथमिक सहकारी दुध उत्पादक संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आरणगाव (ता. शिरुर) येथील फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेने गावातून मागील 5 वर्षापासून दररोज q हजार 200 लिटर दुध संकलित करत त्याचा पुरवठा योग्य पद्धतीने केला, तर यापूर्वी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाच्या किटल्या बोनस म्हणून देत अनेक शेतकऱ्यांना कडबा कुट्टी मशीन उपलब्ध करुन दिल्या आहेत, तर दूध उत्पादक महिलांना पैठणीचे वाटप, दिवाळी दरम्यान सर्वात जास्त दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यास सुवर्ण मुद्रिका देऊन सन्मानित केले तर अनेकदा महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.
सदर दुध उत्पादक संस्थेच्या कार्याची दखल घेत संस्थेला पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक सहकारी संस्थेच्या वतीने आदर्श प्राथमिक सहकारी दुध उत्पादक संस्था पुरस्कार पुणे जिल्हा दूध संघाच्या चेअरमन केशरताई पवार व पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले आहे.
यावेळी पुणे जिल्हा विकास मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार, फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा पोलीस पाटील संतोष निवृत्ती लेंडे, टाकळी भीमाचे पोलीस पाटील प्रकाश करपे, सुभाष कोकाटे, संतोष भालेराव, रमेश चव्हाण, हनुमंत कोकाटे, स्वाती लेंडे, कांचन चव्हाण, उषा कोकाटे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सदर पुरस्कार आमच्या फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेला मिळाल्याने आम्हाला आमच्या संस्थेच्या कामासाठी प्रोत्साहन मिळाले असल्याचे फुलाई सहकारी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा पोलीस पाटील संतोष लेंडे यांनी सांगितले.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…