शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात रस्त्यांवर बेकायदेशीर व अशास्त्रीय पद्धतीने उभारण्यात आलेल्या गतीरोधकांमुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यामुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. त्याचबरोबर वाहनांच्या देखभालीवर मोठा खर्च ओढवत आहे, तर अनेक रस्त्यांवर वाहनांची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण येत आहे.

पुणे – नगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी (ता. शिरूर) येथे खुप मोठे नियमबाह्य टाकण्यात आलेले असून गतीरोधक नागरिकांच्या जीवावर बेतत असून या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार व फोर व्हीलर चालक अपघातग्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर शास्त्रीय नियमानुसार गतीरोधक बसवण्याचे स्पष्ट नियम असतानाही अनेक ठिकाणी हे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

गतीरोधक उभारण्यासाठी शासनाने ठरवलेली नियमावली स्पष्ट आहे. त्यानुसार,सामान्य रस्त्यांसाठी गतीरोधकाची रुंदी ३.७ मीटर व उंची १० सेंटीमीटर असावी. जिथे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते अशा ठिकाणी, गतीरोधकाची लांबी ५ मीटर ठेवण्याचे नियम आहेत.परंतु प्रत्यक्षात, या मापदंडांकडे दुर्लक्ष करून अनेक ठिकाणी उंच, अरुंद, आणि अघोषित गतीरोधक उभारण्यात आले आहेत, जे थेट अपघातांना आमंत्रण देत आहेत.

बेल्हा – जेजुरी, शिरूर – आंबेगाव – जुन्नर मधून जाणारा अष्टविनायक महामार्ग हे रस्ते अलीकडेच दर्जेदार पद्धतीने विकसित करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्यांवर बसवले गेलेले बेकायदेशीर आणि अपूर्णांक गतीरोधक वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहेत. “रस्ते उत्कृष्ट झाले पण गतीरोधकांनी प्रवास भयंकर केला” अशी नागरिकांची प्रतिक्रिया आहे.

राष्ट्रीय महामार्गावर गतीरोधक बसवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष समितीची परवानगी आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी ही परवानगी न घेता बेकायदेशीर गतीरोधक टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे वाहतूक कोंडी व अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे.

सध्या शासनाच्या नियमानुसार, गतीरोधक केवळ शाळा, रुग्णालय अशा अत्यावश्यक ठिकाणीच बसवले जातात. अपघात प्रवण ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी असल्यास पोलीस ठाण्याचा अभिप्राय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केला जातो.

शिरूर ते रामलिंग जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांवर गतीरोधक बसवण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने ग्रामपंचायतींना लेखी सूचनाही दिल्या आहेत. या गतीरोधकांचे नियोजन शास्त्रीय पद्धतीने करण्यात येईल, असेही विभागाकडून सांगण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देताना अनिल जाधव, सहाय्यक अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शिरूर यांनी सांगितले की,शहर व तालुक्यातील रस्त्यांवर अपघात कमी व्हावेत यासाठी गतीरोधक टप्याटप्याने शास्त्रीय पद्धतीने बसवले जातील. बेकायदेशीर गतीरोधकांवर कारवाईसाठी संबंधित ग्रामपंचायतींना सूचना पाठवण्यात आल्या आहेत.”

अपघातात जीव गमावणाऱ्या नागरिकांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य जनतेमध्ये याविषयी तीव्र संताप असून, हे बेकायदेशीर गतीरोधक तातडीने हटवावेत व नवीन गतीरोधक केवळ शास्त्रीय नियमानुसारच बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

2 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

3 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

3 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

3 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

8 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

9 तास ago