महाराष्ट्र

महाराष्ट्राची दिव्या देशमुख बनली ‘वर्ल्ड क्विन’! १९ वर्षीय बुद्धिबळपटूने जिंकला वर्ल्ड कप

मुंबई: महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय खेळाडू कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यात होत असल्याने जेतेपदाची ट्रॉफी प्रथमच आपल्याकडे येईल हे निश्चित आहे.

दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीच्या दोन सामन्यांत १-१ अशी बरोबरी मिळवल्याने टाय ब्रेकरमध्ये मॅच गेली अन् पहिला टायब्रेकरही बरोबरीत सुटला. पांढऱ्या मोहऱ्यांसह हंपीकडे दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये वर्चस्व असेल असे वाटले होते, परंतु दिव्याने सर्वांना अचंबित करणाऱ्या चाली खेळल्या. वेळेचं गणित बसवताना हंपीला तारेवरची कसरत करावी लागली

३८ वर्षीय अनुभवी खेळाडू कोनेरू हंपी व १९ वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यामुळे टायब्रेकमध्ये लढत गेली. पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याकडे अडव्हान्टेज असायला हवा होता. पण, अनुभवी हंपीने चांगली चाल खेळली. १९व्या चालीपर्यंत हंपीचे पटावर वर्चस्व पाहायला मिळाले. दिव्या थोडी दडपणाखाली दिसत होती. ३४व्या चालीत हंपीने हत्ती मारण्याच्या प्रयत्नात तिचा वजीर गमावला आणि सामन्याला अचानक कलाटणी मिळाली होती.

पण, हंपीकडे प्लॅन बी तयार होता आणि तिने त्यानुसार खेळ करताना दिव्याला तिच्या तालावर नाचवले. सततच्या त्याच त्याच चाली झाल्या आणि अखेर ८१व्या चालीनंतर सामना ड्रॉ सुटला. खरं तर पहिल्या टाय ब्रेकरमध्ये दोन्ही खेळाडूंनी संधी गमावली. ३८व्या चालीनंतर दिव्याला विजयाची संधी होती, परंतु तिच्याकडून चुका झाल्या आणि हंपीला नंतर नशिबाची साथ मिळाली

दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये हंपी पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळली. सामना सुरू होण्यापूर्वी हंपी मेडिटेशन करताना दिसली आणि दिव्या तिच्याकडे पाहत होती. दिव्याच्या चेहऱ्यावर पहिल्या टायब्रेकरमध्ये गमावलेल्या संधीचं नैराश्य जाणवत होते. हंपीने कॅटलान ओपनिंगने डावाला सुरुवात केली. पण, दिव्या जलद चाली खेळताना दिसली आणि दोघींमध्ये पाच मिनिटांचा फरक जाणवत होता. हंमीने १० व ११ वी चाल खेळण्यासाठी बराच वेळ घेतला. आता दिव्याकडे अडव्हांटेज होता.

१८ चालीनंतर हंपीकडे फक्त चार मिनिटं शिल्लक होती आणि दिव्याकडे ११:३५ मिनिटं होती. त्यामुळे हंपी दडपणाखाली खेळताना दिसली आणि दिव्या तिच्याकडून चूकीची वाट पाहत होती. ४४व्या चालीत हंपीने तिरप्या रेषेवर वजीर ठेऊन दिव्याला चेक दिला. ४६व्या चातील दोघींनी एकमेकींचा वजीर मारला. चार चालीनंतर दोघींनी हत्तीचे बलिदान दिले. ७५व्या चालीनंतर दिव्याने बाजी मारली आणि वर्ल्ड चॅम्पियन ठरली. १९ वर्षीय दिव्याला या विजयावर विश्वास बसेनासा झाला आणि तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा’च्या चर्चा अफवा; शिंदे ‘चोरीचा माल’ घेऊन शाहांकडे गेले; संजय राऊत

रामरक्षा आंदोलन, राष्ट्रवादी-एनडीए चर्चांपासून ते शिंदे-शाह भेटीपर्यंत अनेक मुद्द्यांवर राऊतांची सडेतोड प्रतिक्रिया   नागपूर: 18…

44 मिनिटे ago

Video: शिरूर तालुक्यात स्वीट होममधील कामगाराला बेदम मारहाण…

शिरूर (तेजस फडके): समोसे देण्याच्या कारणावरुन झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर मारहाणीत झाल्याची घटना कारेगाव (ता.…

1 तास ago

चासकमान डाव्या कालव्यातुन ६०० क्युसेकचा विसर्ग; खाली पोहचते १८० क्युसेकने पाणी मग ४२० क्युसेक पाणी नक्की जाते कुठे…?

धरणापासून अस्तरीकरण करण्याऐवजी टेलकडून काम सुरु करण्याचा घाट; प्रशासन आणि राजकीय नेतृत्वाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह...?…

3 तास ago

जि.प. शाळा सोनेसांगवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत यशाची भरारी…

शिरूर (नितीन थोरात) : सन 2025 -26 या शैक्षणिक वर्षात झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी चमकदार…

5 तास ago

अमित शाह-शिंदे भेटीत विकासावर भर; शिवसेनेच्या ६ खासदारांच्या मतदारसंघांना केंद्राकडून गतीचे आश्वासन

नवी दिल्ली : 'उबाठा' गटातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

15 तास ago

राज्यातील १९ महाविद्यालयांत १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प; चंद्रकांत पाटील यांचे कामांना गतीचे निर्देश

मुंबई: राज्यातील छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नांदेड जिल्ह्यातील १९ महाविद्यालयांमध्ये पुढील १८ महिन्यांत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात…

15 तास ago