क्राईम

शिरुर तालुक्यात महिलेचा पाठलाग करुन शिवीगाळ, दमदाटी करत विनयभंग…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका कंपनीत कामाला जाणाऱ्या महिलेचा वारंवार पाठलाग करत महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप संभाजी कंद्रूप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

करंदीत सदर महिला परिसरातील एका कंपनीत कामाला असून महिला कामाला जाताना व घरी येताना संदीप हा वारंवार तिचा दुचाकीहून पाठलाग करत राहिला. त्याने वारंवार महिलेला चल माझ्या गाडीवर बस मी तुला सोडतो असे म्हणाला मात्र महिलेने त्यास नकार दिला. मात्र त्याने पुन्हा तसेच कृत्य करत महिलेला दुचाकीवर बसण्यास सांगितले. परंतु महिलेने त्यास नकार दिल्याने त्याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.

याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी संदीप संभाजी कंद्रूप याच्या विरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भरत कोळी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

1 तास ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

16 तास ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

17 तास ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

2 दिवस ago

शिरुर; शेतकऱ्याचे महाडीबीटी योजनेतील 24 हजार अनुदान वर्षभरातही सरकारला देता येईना…

शिरुर (तेजस फडके) सध्या राज्यात लोकसभेची रणधुमाळी चालु असुन मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी किती चांगल्या योजना…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 दिवस ago