शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणारे व्यक्ती दुपारच्या सुमारास शेतात गेलेले असताना अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तीन लाखांचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पाबळ (ता. शिरुर) येथील कमळळोबाचा माळ परिसरात राहणाऱ्या विमल चौधरी यांच्या शेतातील विहिरीचे काम सुरु असल्याने दुपारच्या सुमारास घरातील सर्व लोक घराला कुलूप लावून शेतात गेलेले होते. सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास विमल चौधरी घरी आल्या असताना त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे त्यांनी घरात पाहिले असता कपाट उघडे तसेच सर्व साहित्य अस्थाव्यस्थ पडल्याचे दिसून आले. दरम्यान त्यांनी घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 3 लाख 10 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
याबाबत विमल भानुदास चौधरी (वय ५३) रा. कमळळोबाचा माळ पाबळ (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी व पोलीस नाईक प्रताप कांबळे हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…