क्राईम

‘लकी शनिवार’ अन् दादर लोकलमध्ये चोरी! ६५ वर्षीय आज्जीचा पर्दाफाश

मुंबई : दादर रेल्वे स्थानक परिसरात लोकल ट्रेनमध्ये सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीच्या सलग घटनांनी रेल्वे पोलिसांसमोर आव्हान उभे केले होते. दोन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिसांच्या नजरेत आलेल्या ६५ वर्षीय महिलेचा अखेर पर्दाफाश झाला. पोलिसांनी तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी आलेल्या या महिलेला रंगेहात अटक केली. अनघा जोशी असे आरोपी महिलेचे नाव असून, ती मूळची पुण्याची रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे.

CCTV फुटेजमुळे संशयित महिलेचा माग काढला

२ मे रोजी दादर स्थानकात बोरीवली लोकल पकडताना एका ४४ वर्षीय बँक कर्मचाऱ्या महिलेची सुमारे ६७ हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरीला गेली होती. त्यानंतर ६ जून रोजी याच स्थानकात एका फायनान्स एक्झिक्युटिव्ह महिलेचे सुमारे ८९ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरीला गेले.

दोन्ही घटनांचा तपास करताना रेल्वे पोलिसांनी स्थानकातील CCTV फुटेज तपासले. त्यावेळी चोरीच्या घटनांच्या आसपास एक वृद्ध महिला संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी तिच्यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली.

‘लकी शनिवार’ मानून पुण्याहून मुंबईत यायची

तपासादरम्यान अनघा जोशी ही महिन्यातील पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी पुण्याहून मुंबईत येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे दिवस चोरीसाठी ‘लकी’ असल्याचा तिचा समज असल्याचे तपासात समोर आले. तिसऱ्यांदा चोरी करण्यासाठी ती मुंबईत आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिला रंगेहात पकडले.

२० वर्षांपूर्वीही साखळी चोरी केल्याचे समोर

पोलिसांच्या चौकशीत अनघा जोशीची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमीही समोर आली. सुमारे २० वर्षांपूर्वी ती साखळी चोरीच्या घटनांमध्ये सहभागी होती. काही महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर तिने चोरीचा मार्ग सोडून संसार सुरू केला होता.

मात्र मुलाचा अपघाती मृत्यू आणि पतीच्या निधनानंतर तिच्यावर आर्थिक संकट आले. त्यानंतर तिने पुन्हा चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

मुंबईत चोरी, पुण्यात दागिन्यांची विक्री

पोलिसांच्या माहितीनुसार, अनघा जोशी मुंबईतून चोरलेले दागिने पुण्यात नेऊन सराफांकडे विकत होती. पोलिसांनी पुण्यातील संबंधित सराफांकडून चोरीचे दागिने हस्तगत केल्याचे सांगण्यात आले आहे.आरोपी महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले असून, तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रेल्वे पोलीस करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

7 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

8 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

8 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

8 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

8 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

19 तास ago