क्राईम

शेतकऱ्याच्या कांद्याच्या वखारीला लावली आग; अडीचशे पिशव्यांचे नुकसान…

मंचर (कैलास गायकवाड): खडकवाडी (ता. आंबेगाव) येथील धुमाळस्थळ वस्तीमध्ये संदीप बबन धुमाळ (रा. धुमाळ स्थळ) या शेतकऱ्याच्या तात्पुरत्या लाकूड आणि बाजरीच्या सरमाडाने केलेल्या कांदा वखारीला अज्ञात व्यक्तीने आग लावून दिल्याने सुमारे अडीचशे पिशव्या कांद्याचे नुकसान झाले आहे.

सध्याच्या चालू असलेल्या बाजारभावाप्रमाणे अंदाजे दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. अडीचशे पिशवी कांदा आगी पासून वाचण्यात यश आले आहे. मच्छिंद्र कानिफनाथ धुमाळ, अतुल दगडू धुमाळ, अजय बाळासाहेब धुमाळ व इतर शेतकऱ्यांनी वखारीकडे धाव घेत पाणी मारून आग आटोक्यात आणली. त्यामुळे बरेचसे नुकसान होणारे वाचले.

कांद्याच्या वखारी शेजारी रिकामी पेट्रोलची बाटली सापडल्यामुळे कुणीतरी आज्ञात व्यक्तीने वखार पेटवून दिली, अशा आशयाची तक्रार संदीप बबन धुमाळ यांनी पारगाव पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कालेकर हे प्रभारी अधिकारी सपोनि गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

शिरूर शहर व तालुक्यात ‘कामगार साहित्य वाटप’ योजनेच्या नावाखाली दलालीचा उघड धंदा

Video: वाघाळे येथे ग्रामस्थांचा वाढदिवस एकत्रित साजरा…

चिमुकल्यांच्या आक्रोशात दडलेली व्यवस्था; रांजणगावातील तिहेरी हत्याकांडाचा आरसा

शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु

शिरुर; वरुनराजाची कृपा झाली अन अनेक दशकानंतर मे महिन्यात मोटेवाडीचा तलाव तुडुंब भरला

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

6 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago