औरंगाबाद: देशविरोधी कट रचल्याचा आरोप असलेल्या PFI च्या सदस्यांना ATS ने ताब्यात घेतले आहे. तर औरंगाबादमध्ये मनसेने PFI च्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असल्याचं समोर आले आहे. औरंगाबादेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी PFI च्या कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मनसे शहर उपाध्यक्ष अमित भांगे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आज सकाळी शहरातील जिन्सी भागातील पीएफआय कार्यालयावर जाऊन धडकले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिसरात एकच गोंधळ उडाला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
ATS ने औरंगाबाद मधून ताब्यात घेतलेले PFI चे पदाधिकारी खालील प्रमाणे…
बायजीपुरा भागातून परवेज खान मुजम्मील खान, (वय 26), रा.बायजीपुरा औरंगाबाद, परवेज हा पीओपीचे काम असून मिळालेल्या माहितीनुसार तो काही वर्षांपासून तो पीएफआय संघटनेचे काम करतो. किराडपुरा भागातून मौलाना इरफान मिल्ली (वय 37), रा. किराडपुरा औरंगाबाद). इरफान मदरशामध्ये अरबी आणि उर्दूची शिकवणी घेतो आणि त्याला मौलाना म्हणून ओळखले जाते.
सय्यद फैजल सय्यद खलील (वय 28), रा. मेहमूद पुरा औरंगाबाद). फैजलचे अत्तर विक्रीचे दुकान असून, मागील चार वर्षापासून तो पीएफआय या संघटनेत सक्रिय असल्याचे समोर आले आहे. शेख नासेर शेख साबेर उर्फ नदवी (वय 37), रा. बायजीपुरा, औरंगाबाद शेख नासेर PFI चा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…
एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…
मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…
मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…
चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…
मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…