क्राईम

फॉलोअर्स वाढवण्यासाठी काव्याने आई-वडिलांसोबत मिळून रचले नाटक…

औरंगाबाद: औरंगाबाद मधील प्रसिद्ध युट्यूबवर बिनधास्त काव्या गायब झाल्याची घटना घडली होती. मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हे नाटक रचले होते. कारण समाज माध्यमांवर फॅनकडून ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो त्या प्रमाणात कमाई होते. त्यामुळे अशा खालच्या पातळीवर जाऊन दर्जाहीन प्रसिद्धीसाठी हे कृत्य केलं गेलं असल्याची माहिती बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा अ‌ॅड. आशा शेरखाने-कटके यांनी दिली आहे.

घरातून निघून गेल्यावर काव्या मध्य प्रदेशातील इटारसी स्थानकावर सापडल्यावर इटारसीच्या पोलिसांनी तिथल्या बाल न्याय मंडळासमोर तिला हजर करणं कायद्यानुसार बंधनकारक होतं. मात्र, या सर्व बाबींना फाटा देत पोलीस तिला सरळ औरंगाबादला घेऊन आले आणि आई-वडिलांच्या ताब्यात दिलं. हा सगळा खटाटोप फक्त पैशांसाठी केला गेला. त्यामुळे काव्याच्या आई-वडिलांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.

याबाबत बोलताना बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष ॲड. आशा शेरखाने-कटके म्हणाल्या की, दर्जाहीन प्रसिद्धीसाठी पोलीस, रेल्वे, बाल न्याय मंडळ या यंत्रणांना वेठीस धरलं गेलं. हा सर्व घटनाक्रम पूर्वनियोजित होता, असं स्पष्ट होतं. नागरिकांना भावनाविवश करुन लाइक करण्यास भाग पाडलं गेलं. प्रसिद्धीसाठी यंत्रणेस वेठीस धरणे योग्य नसल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

11 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

11 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

11 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago