Categories: क्राईम

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू….

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर चाकण बाजूकडून एका दुचाकीवरुन तिघेजन आलेल्या दुचाकीची एका वृद्धाला धडक बसल्याने फुलचंद विठोबा रणदिवे या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दुचाकी चालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर चाकण रस्त्यालागत असलेल्या एस्सार पेट्रोल पंप समोरुन फुलचंद रणदिवे हे रस्ता ओलांडत असताना चाकण बाजुने आलेल्या नंबर नसलेल्या तसेच दुचाकीवर तिघेजन असलेल्या दुचाकीची रणदिवे यांना जोरदार धडक बसून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान फुलचंद विठोबा रणदिवे (वय ७८) रा. भांबोरा ता. कर्जत जि. अहमदनगर यांचा जागीच मृत्यू झाला. घडलेल्या घटनेबाबत किशोर रामदास रणदिवे (वय २३) रा. आनंदनगर चाकण ता. खेड जि. पुणे मूळ रा. भांबोरा ता. कर्जत जि. अहमदनगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

शिक्रापूर पोलिसांनी दुचाकीचालक ऋतिक संतोष कदम, नवनाथ सुरेंद्र यादव, प्रियेश लालबहाद्दूर शहा तिघे रा. कामशेत ता. मावळ जि. पुणे यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजेश माने हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

11 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

3 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

4 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

4 दिवस ago