शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात एका व्यक्तीसह त्याच्या घराच्या व्यक्तींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत पत्नीला मारहाण करुन पत्नीवर अनैसर्गिक संभोग केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विवाहितेच्या पती सह आदी 6 जणांवर शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील विवाहितेला तिचा पतीने वेळोवेळी मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. याबाबत विवाहितेने तिच्या सासू सासऱ्यांनासह आदींना सांगितले असता त्यांनी देखील तिला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. तसेच तिच्या पतीने वारंवार तिच्याशी अनैसर्गिक संभोग केला. याबाबत विवाहितेने वारंवार तिच्या आईला माहिती दिली. परंतु विवाहीतेला जास्तच त्रास होऊ लागल्याने तिने आपले माहेर गाठत पुणे पोलिसांत तक्रार दिली.
दरम्यान पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल करत सदर गुन्हा शिक्रापूर पोलिसांकडे वर्ग केला असल्याने शिक्रापूर पोलिसांनी विवाहितेच्या पती सह आदी 6 जणांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे या करत आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…