शिरूर तालुका

डॉ. नितीन सोनवणे यांना महात्मा गांधी शांती पुरस्कार प्रदान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांना नुकतेच नॅशनल ह्यूमन राइट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२२ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांनी अनेक सामाजिक कामे करत शालेय मुलांचा गुणगौरव, शालेय मुलांना मदत करत शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांवर मोफत उपचार केले आहेत, तर शिक्रापूर येथील कचरा समस्या तर करंदी येथील शौचालय याबाबत आवाज उठवला आहे.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी प्राणीमित्रांना मिळून आलेल्या जखमी प्राण्यांसह पक्षांवर देखील मोफत उपचार केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत नॅशनल ह्यूमन राइट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्त कैजर खालिद यांच्या हस्ते महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२२ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

याप्रसंगी ठाणे चे उपायुक्त योगेश चव्हाण, वीरचक्र विजेते कॅप्टन अरुण माळी, नॅशनल ह्युमन राईट्स फेडरेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष अब्दुल जब्बर शेख, शब्बीर खान, प्रशांत ढोले, दीपक पुजारी यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. तर डॉ. नितीन सोनवणे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत तर याबाबत बोलताना केलेल्या कार्याचा गौरव असून यामुळे पुढील कामांना प्रेरणा मिळाली असल्याचे डॉ. नितीन सोनवणे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

10 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

13 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

15 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago