क्राईम

पुणे नगर महामार्गावर दुचाकीच्या धडकेत दोन दुचाकीचालक जखमी

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथे पुणे नगर महामार्गावरुन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दुचाकीची समोरुन आलेल्या दोघा दुचाकी चालकांना धडक असून दोघे दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे सुरेंदर नागसाई मराबी या दुचाकी चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन परमेश्वर लोंढे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ जि यु ४३५६ या दुचाकीहून तर आकाश शीरमुरे हे त्यांच्या ताब्यातील एम एच २५ ए यु ०५३२ या दुचाकीहून पुणे बाजूने अहमदनगर दिशेने येत असताना समोरुन सुरेंदर मराबी हा त्याच्या ताब्यातील एम एच १२ बी ए ३५९२ या दुचाकीहून विरुद्ध दिशेने आला यावेळी सुरेंदरची समोरुन आलेल्या दोघा दुचाकिंना धडक बसून दोघे दुचाकी चालक जखमी झाले, तर दोन्ही दुचाकींचे नुकसान झाले यामध्ये परमेश्वर नागनाथ लोंढे व आकाश प्रकाश शीरमुरे हे दोघे जखमी झाले आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati

याबाबत पोलीस शिपाई अंबादास अश्रुबा थोरे (वय २७) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी दुचाकी चालक सुरेंदर नागसाई मराबी (वय १९) रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. अंदरी ता. रजनीग्राम जि. अनकपूर मध्यप्रदेश याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश मळेकर हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

20 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago