shikrapur-crime
शिक्रापूर: अहिल्यानगर-पुणे महामार्गावर दारू पिऊन तंग झालेल्या युवकाने मोठा धिंगाणा घातला. पीएमपीएमएल बसपासून ते चार चाकी वाहने रस्त्यात अडवून दारूच्या नशेत रस्ता जाम करण्याचा प्रकार त्याने केला. यावेळी काही वाहनचालकांना व प्रवाशांनी त्याला किरकोळ मारहाण केली.
ऋषिकेश कैलास सुकाळकर (रा. नेवासा फाटा, अहिल्यानगर) असे या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर पोलीसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दारूच्या नशेत त्याने महामार्गावरच धिंगाणा घालण्यास सुरवात केली. पीएमपीएमएल बस अडवून त्याच्या मागे तो पळत होता. रस्त्याने जाणार्या अनेक चारचाकी वाहनांना थांबवून त्यांचे दरवाजे तोडण्याचा प्रयत्न करत होता. घाबरलेल्या वाहन चालकांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळे तो बोनेटवर बसून गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांना खबर मिळताच त्याला शिक्रापूर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. या मद्यपीची झिंग उतरताच आपल्याला काही काही आठवत नसल्याचे त्याने शिक्रापूर पोलिसांना सांगितले.
दरम्यान, दारुड्याचा प्रताप बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी झाली होती. शिवाय, अनेकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिरूर शहरातून चोरीस गेलेली मोटारसायकल परजिल्ह्यातून हस्तगत…
शिक्रापूरमध्ये सजग नागरिकांमुळे वाट चुकलेल्या दोन चिमुकल्या पालकांच्या स्वाधीन!
अपघाताचा थरार! शिक्रापूर-चाकण रस्त्यावर कंटेनरने पोलीस वाहनांसह नागरिकांना चिरडलं…
शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांची हत्या महिलेसोबत झालेल्या चॅटींगच्या रागातून…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…