शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत दि. ०४/०४/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने रिलायन्स जिओ इंन्फोकॉम लिमीटेड या कंपनीच्या पत्र्याचे गोडाऊनची पाठीमागील भिंत फोडुन भिंतीला होल करून त्यानंतर त्या होलवाटे गोडाऊनमध्ये प्रवेश करून २,४६,७५०/- रू. किंमतीची ३५२५ मिटर कॉपर केबल, १२,५००/- रू. किंमतीचे ५ केबल कनेक्टर व ३,००,०००/- रू. किंमतीच्या १० बॅटऱ्या असा एकुण ५,५९,२५०/- रू. किंमतीचा माल चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत फिर्यादी नामे नितीन गोपाळा भोर, (वय ४० वर्षे, व्यवसाय नोकरी, रा. ऑक्सी डिझायर सोसायटी, गाडेवस्ती, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
त्याप्रमाणे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी शिक्रापूर , जातेगाव, सणसवाडी, कोरेगाव भिमा, लोणीकंद, वाघोली व पुढे शहर परीसरामध्ये गुन्हयाचा तांत्रीक पध्दतीने तपास केला असता, सदरचा गुन्हा करण्यासाठी आरोपींनी एक लाल रंगाची युनिकॉर्न गाडी व एक टेम्पो वापरला असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे पोलीसांनी आरोपींची माहीती काढुन गुन्हयाचे तपासामध्ये आरोपी नामे १) आलम युनुस मनीयार, (वय ३४), रा. गायकवाडनगर, पुनवळे ता. हवेली जि. पुणे), २) अनिल लखीराम गुप्ता, (वय ३९) सध्या रा. लक्ष्मीमाता मंदिर, भारतनगर, कत्तारवाडी, येरवडा, पुणे), ३) विरेंदर धरमसिंग जाटाव, (वय २७), रा. गायकवाडनगर, पुनवळे, ता. हवेली, जि.पुणे, मुळ रा. गडीवाधवा, ता. हिंडोनसीटी, जि.करोली, राज्य राजस्थान), ४) विशाल पप्पू कश्यप, (वय १९), सध्या रा. मुंजाबावस्ती, विमान बिल्डींग शेजारी, श्रीहंसनगर धानोरी पुणे. मुळ रा. मुलीयामऊ, कायतंगापुर्वा, ता.जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश), ५) शिवम बजरंगी कश्यप, (वय २२), सध्या रा. सध्या रा. मुंजाबावस्ती, विमान बिल्डींग शेजारी, श्रीहंसनगर, धानोरी, पुणे. मुळ रा.मुलीयामऊ, कायतंगापुर्वा, ता.जि. रायबरेली, राज्य उत्तरप्रदेश), ६) शामजी चिकनू यादव, (वय २४), सध्या रा. गायकवाडनगर, पुनवळे, ता.हवेली, जि.पुणे. मुळ रा. तिरलोकपुर, ता.इटवा, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता, आरोपींनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींकडुन चोरलेल्या मालापैकी ३,००,०००/- रू. किंमतीच्या १० बॅटऱ्या तसेच गुन्हा करण्यासाठी वापरलेला १ टेम्पो व १ मोटार सायकल असा एकुण ९,००,०००/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हयाचे तपासामध्ये सदर ६ आरोपींना अटक करण्यात आली असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही पंकज देशमुख,पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक पुणे,प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरूर यांचे मार्गदर्शनाखाली दिपरतन गायकवाड पोलीस निरीक्षक शिकापुर पोलीस स्टेशन, महेश डोंगरे पोलीस उपनिरीक्षक यांचेसह ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोहवा/श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, शिवाजी चितारे, जयराज देवकर, अमोल नलगे यांचे पथकाने केली आहे.